वीजपुरवठा खंडित

By Admin | Updated: June 26, 2014 02:04 IST2014-06-26T01:49:51+5:302014-06-26T02:04:43+5:30

शेगाव येथील नागरिक वीज कार्यालयावर धडकले

Power supply breaks | वीजपुरवठा खंडित

वीजपुरवठा खंडित

शेगाव: मागील काही दिवसांपासून वेळोवेळी खंडित होणार्‍या वीजपुरवठय़ामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवारी वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा आणला. यामध्ये प्रभाग १ हा शहराशी तात्काळ जोडावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शहरातील रेल्वेगेट बाहेरचा परिसर वेगळे फिडर करुन जोडण्यात आल्यामुळे मुख्य शहरातील वीजपुरवठा सुरु राहतो मात्र प्रभाग १ चा रेल्वेगेट बाहेरील परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. २४ जून रोजी संध्याकाळी ७ वा.पासून रात्री ११वा.पर्यंत चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या १00 ते १५0 रहिवासी नागरिकांनी नगरसेवक विजय यादव यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनी कार्यालय गाठून २५ जून रोजी कंपनीचे सहाय्यक अभियंता हर्षीतकुमार वाकोडे, शहर विभाग अभियंता आशिष कलावटे यांची भेट घेत शहरा तील इतर भागात वीजपुरवठा सुरु असतांना आमच्या भागाचा पुरवठा खंडीत करुन भेदभाव केल्या जात असल्याचा जाब विचारला.

Web Title: Power supply breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.