शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पावसाने वीज गुल; रात्रीच्या अंधारात खामगावात रंगला खुनाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 13:30 IST

प्रतीहल्ल्यात एक जखमी: चौघांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जोरदार वादळी वार्यासह आलेल्या चक्रीवादळाचे थैमान थांबत नाही तोच, खामगावात वीज गुल असताना खुनाचा थरार रंगला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानका समोर ही घटना घडली. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ माजली आहे.

तक्रारीनुसार, मृतक प्रकाश गोपीनाथ सोनी (५२) त्यांच्या बसस्थानकासमोरील हाॅटेलात बसले असताना विजय सहदेव बढे, विठ्ठल एकनाथ बढे आणि दोन अनोळखी इसम घटनास्थळी आले. १५ दिवसांपूर्वी दुकानावर आलेल्या आमच्या माणसांना धक्का का मारला असा जाब विचारत कुकरी (तीष्ण हत्याराने) प्रकाश सोनी यांना भोसकले. छातीत घाव लागल्याने सोनी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना प्रत्यक्षदर्शीनी एका आरोपीस पकडले.

दरम्यान, काहींच्या हाताला झटका देत पकडलेला आरोपी खामगाव बाळापूर रस्त्याने धावत सुटला. संतप्त जमावाने पाठलाग करून आरोपीस पकडले. त्यावेळी घटनास्थळी वेळीच पोलीस दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलीसांनी आरोपीला पकडून खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती केले. तर तीन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी गोपाल प्रकाश सोनी २७ रा. रेखा प्लॉट, सती फैल यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी विजय सहदेव बढे, विठ्ठल एकनाथ बढे आणि आणखी दोन अनोळखी इसमाविरोधात भादंवि कलम ३०२, ३४ गुन्हा दाखल केला. यातील आरोपी विजय बढे हा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस असल्याचे समजते.घटनास्थळावरून कार जप्त

घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळी सोडलेली एक कार शहर पोलिसांनी जप्त केली. ही कार शहर पोलीस स्टेशनला लावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार पैशांच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा पोलीस वतुर्ळात होत आहे. त्यामुळे शहर पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. शहर पोलीसांनी घटनास्थळाचे सोमवारी दुपारी स्थळ निरिक्षण केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी