वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By Admin | Updated: June 16, 2017 19:40 IST2017-06-16T19:40:28+5:302017-06-16T19:40:28+5:30
नागरिकांचा संताप: भाजप पदाधिकारी संतप्त

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मान्सूनपूर्व रखडलेली कामे आणि शहरातील विद्युत समस्येबाबत शुक्रवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी कानपिचक्याही दिल्या.
खामगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत कंपनीकडून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. वारंवार तक्रार देवूनही उपयोग होत नाही, तसेच तक्रार केंद्रावरील संबधीत कर्मचारी फोन उचलत नाही, यासह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांबाबत गुरूवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष संजय शिनगारे, पाणी पुरवठा सभापती सतीश दूडे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, बांधकाम सभापती विलास देशमुख, देवेश भगत, भाजयुमोचे अध्यक्ष राम मिश्रा यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.