दीड महिन्यापासून वीज गायब
By Admin | Updated: November 14, 2014 00:17 IST2014-11-14T00:03:03+5:302014-11-14T00:17:03+5:30
मेहकर तालुक्यातील रायपूर येथील प्रकार.

दीड महिन्यापासून वीज गायब
मेहकर (बुलडाणा) : तालुक्यातील रायपूर येथील शेतातील विद्युत रोहित्र गेल्या दीड महिन्यापासून जळालेले आहे. त्यामुळे शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकर्यांना रब्बी हंगामाला पाणी देणे अवघड होऊन बसले आहे.
खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हा तचे पीक गेल्यामुळे शेतकर्यांच्या आता रब्बीकडे नजरा लागल्या आहेत. रब्बी िपकालाही पाण्याची अत्यंत आवश्यकता असून, त्यासाठी शेतकर्यांनी विहिरीवर कृषी पंप बसविलेले आहेत; परंतु शेतातील विद्युत रोहित्रच जळाल्याने तब्बल दीड महिन्यापासून शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे येथे पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांचेही दुर्लक्ष आहे. पिकाला पाणी देता येत नसल्याने शेतातील तूर, हळद, बटाटा व भाजीपाल्याचे पीक धोक्यात आले आहे. पाण्याअभावी हळदीचे पीक तर पुर्णपणे सुकलेले आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याबरोबर गुरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देऊन येथे त्वरित विद्युत रोहित्र बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.