शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील पंखे बंदची शिक्षा; जबाबदार कार्यालयाची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:02 IST

क्षा म्हणून जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या कार्यालयातील पंखे व वातानुकुलीत यंत्रणा सुरू होणार नाही याची कल्पना आली.

- प्रा.नानासाहेब कांडलकर  जळगाव जामोद : जळगाव जामोदएसटी बसस्थानकावरील पंखे हे अनेक महिन्यापासून बंद आहेत. ते सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव आगार प्रमुखांकडून विभागीय नियंत्रकांकडे आणि तेथून मुंबईच्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु त्याची दखल या कार्यालयाने न घेतल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ना.दिवाकरराव रावते यांना मिळताच त्यांनी चक्क संबंधित कार्यालयाचीच वीज बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी कार्यालयामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य मिरविणाऱ्या एसटीच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांची नीट सेवा न केल्यामुळे चक्क घामाने ओले चिंब होऊन दिवसभर काम करण्याची यामुळे वेळ आली. तर या निर्णयाने ना.दिवाकर रावते यांनी लोकाभिमुख शासनाचा प्रत्यय आणून दिला. बसस्थानकावरीले इलेक्ट्रीक पंखे अनेक महिन्यापासून बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना झाली नाही. आगार प्रमुख व विभागीय नियंत्रक यांनी नवीन पंखे बसवून देण्यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यापुर्वी पाठविला. परंतु संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नाही. ही बाब जेव्हा ना. रावते यांच्या निदर्शनास आली.तेव्हा त्यांनी या घटनेची दखल घेवून प्रस्तावाला विलंब झाल्याने त्या कार्यालयाची वीज तोडण्याचे आदेश दिले. कार्यालयीन दप्तर दिरंगाईमुळे सर्वसामान्य प्रवाशांना उन्हाचा चटका बसला त्याची शिक्षा म्हणून जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या कार्यालयातील पंखे व वातानुकुलीत यंत्रणा सुरू होणार नाही याची कल्पना आली. त्यामुळे तातडीने हा प्रस्ताव मंजुर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. महामंडळ अध्यक्षांच्या या अकल्पित कृतीमुळे अधिकाºयांना तर घाम फुटलाच. परंतु अशा दप्तर दिरंगाईची जशास तशी शिक्षा दिल्याने सगळेच अधिकारी सध्या अवाक झाले आहेत.

संबंधित कंत्राटदार कंपनीकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. तसेच त्यांना रिमांडर सुध्दा देण्यात आले होते. परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही हे खरे आहे. मंत्री महोदयांनी संबंधित कार्यालयाच्या बाबत अकल्पित कृती केल्याची मात्र माहिती नाही.- संदीप रायलवार,विभाग नियंत्रक एसटी महामंडळ बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोदstate transportएसटी