बाजारपेठेत बटाट्यांच्या दर घसरले

By Admin | Updated: April 7, 2015 01:52 IST2015-04-07T01:52:10+5:302015-04-07T01:52:10+5:30

अधिक उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका; २0 दिवसांत दुपटीने पडले दर.

Potato prices dropped in the market | बाजारपेठेत बटाट्यांच्या दर घसरले

बाजारपेठेत बटाट्यांच्या दर घसरले

अकोला - बाजारपेठेत नवीन बटाटा झाला असून बटाट्याचे दर कमालीचे घसरले आहेत. दरम्यान, गेल्या २0 दिवसांमध्ये शेतमालाचे दर दुपटीने कमी झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये आणखी घटण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली . नवीन बटाटा बाजारात दाखल होण्यापूर्वी बटाट्याच्या दराने गृहिणींचे बजेट बिघडविले होते. २५ ते ३0 रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या बटाट्यांचे दर सध्या ठोक बाजारपेठेत ५ ते ५.५0 रुपयांवर आले आहेत. अकोला येथील बाजारपेठेत रविवारी बटाटे ५२0 रुपये क्विंटलने विकरग गेला. २0 मार्चपर्यंत बटाट्यांचे दर ११00 रुपये होते. २५ मार्चनंतर उत्तर प्रदेशातील नवीन बटाटा बाजारपेठेत पोहोचताच दर पडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ८00 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गेलेल्या बटाट्यांना आता क्विंटलमागे ५२0 रुपये दर मिळत आहेत. किरकोळ बाजारात हेच बटाटे ६ ते ७ रुपये किलो विकले जात आहेत. गत २0 दिवसांमध्ये बटाट्यांचे दर दुपटीने खाली आल्याने शे तकर्‍यांना मोठा फटका बसला आहे.

Web Title: Potato prices dropped in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.