इंटरनेटअभावी पोस्टाची सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:16+5:302021-08-28T04:38:16+5:30
मध्यंतरीच्या काळात पोस्ट सेवेला फार महत्त्व नव्हते. मात्र, पोस्ट बँक झाल्यापासून आणि केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये थेट सहभाग ...

इंटरनेटअभावी पोस्टाची सेवा ठप्प
मध्यंतरीच्या काळात पोस्ट सेवेला फार महत्त्व नव्हते. मात्र, पोस्ट बँक झाल्यापासून आणि केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये थेट सहभाग घेता येतो, या उद्देशाने पोस्टाने आपली व्याप्ती वाढविली. परिणामी, पोस्टाचे खातेदार वाढले आणि व्यवहारही वाढला आहे. दरम्यान, गेले पंधरा दिवस पोस्टातील व्यवहार ठप्प झाले असून, या संदर्भात पोस्ट अधिकाऱ्यांनी भारत संचार निगमच्या देऊळगाव राजा येथील अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात होत असलेल्या अडचणीची माहिती दिली आहे. असे असतानाही बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसांत कोणतीच कारवाई केली नसल्याने, पोस्टाचे या पंधरा दिवसांत जवळपास ५० लाख रुपयांचे व्यवहार होऊ शकले नाही. याचा मनस्ताप खातेदारांना सोसावा लागत आहे. याही परिस्थितीत स्थानिक पोस्ट कर्मचाऱ्यांनी देऊळगाव राजा येथील पोस्ट ऑफिसमधून काही महत्त्वाचे व्यवहार पूर्ण केले. दूरसंचार विभागाने त्वरित या समस्येचे निराकरण करून सेवा पुरवत करावी, अशी मागणी पोस्ट खातेधारकांकडून होत आहे.
तीन दिवसांत सेवा पूर्ववत होईल
पोस्ट ऑफिसकडून काही पेमेंट येणे आहे. हा एक महत्त्वाचा विषय असला, तरीही येत्या दोन-तीन दिवसांत पोस्टची इंटरनेट सेवा सुरू होईल, अशी माहिती दूरसंचार विभागाचे देऊळगाव राजा येथील अधिकारी गोपी किशन यांनी दिली.
पोस्ट ग्राहकांचे नुकसान
इंटरनेटसेवा ठप्प असल्याने पोस्ट खातेदारांच्या मोठे नुकसान होत आहे. १२ ऑगस्टपासून ही इंटरनेटसेवा बंद आहे. या संदर्भात पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून, दूरसंचार विभागालाही तीन वेळा लेखी तक्रार दिली आहे.
- सचिन पाटील,पोस्ट मास्तर, सिंदखेडराजा.