तांत्रिक अडचणीमुळे टपाल सेवा बंद
By Admin | Updated: October 14, 2015 00:38 IST2015-10-14T00:38:22+5:302015-10-14T00:38:22+5:30
नांदुरा येथील नागरिकांना सहन करावा लागला त्रास.

तांत्रिक अडचणीमुळे टपाल सेवा बंद
किशोर खैरे / नांदुरा (जि. बुलडाणा): टपाल कार्यालये ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असतानाच १३ ऑक्टोबरला टपाल कार्यालयात संगणकातील तांत्रिक अडचणीमुळे देशभर सेवा ठप्प झाली होती. मंगळवारी सकाळपासूनच पोस्ट कार्यालय उघडताच ग्राहकांना पोस्ट ऑफीसमधील संगणकावर ऑनलाईन काम करीत असताना पिनॅकल सॉफ्टवेअरद्वारा लिंक मिळत नसल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान ही लिंक मिळाली तर इंटरनेट सेवा ठप्प होत होती. या तांत्रिक गोंधळामुळे पोस्ट ऑफीसमधील अधिकारी कर्मचार्यांसह नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पोस्ट ऑफीसचे आधुनिकिकरण देशभर सुरू असून आहे. मात्र या तांत्रिक अडचणीमुळे टपाल खात्याची सेवा मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत झाली होती. दरम्यान, सायंकाळ पर्यंत ही सेवा सुरळीत झालेली नव्हती. त्यामुळे डिजीटल इंडियाचे स्वप्न घेऊन वाटचाल करीत असताना कर्मचार्यांच्या बेजबाबदारपणामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा नांदुर्यात होती. त्यामुळे अनेकांनी मंगळवारी टपाल विभागाच्या नावाने बोटं मोडली. पोस्ट ऑफीसचे कार्यालयीन कामकाज संगणकाद्वारे ऑनलाईन होत आहे. मात्र आज दिवसभर संगणकावर लिंक मिळत नसल्याने पोस्टाची सेवा ठप्प होती. अशा परिस्थिती ती उद्याही सुरू होईल की नाही, हे सांगता येत नसल्याचे डाक अधीक्षक व्ही. पी. फिरके यांनी सांगीतले. सुरळीत कामकाजाची शाश्वती नाही लिंक मिळत नसल्यामुळे पोस्टाची सेवा ठप्प होती. दिवसभर सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे सेवा ठप्प राहीली. बुधवारीही सेवा सुरळीत होण्याची शाश्वती नसल्याचे सुत्रांनी सांगितले.