बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी घातपाताची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:23 IST2017-08-19T00:22:41+5:302017-08-19T00:23:31+5:30

इसोली : किन्ही नाईक बिटमध्ये  मृत अवस्थेत आढळलेल्या  बिबट्याप्रकरणी घातपात झाला असल्याची चर्चा होत असून, वन  विभागाने सखोल चौकशी करून बिबट्याच्या शिकारीस  कारणीभूत ठरलेल्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

The possibility of death of leopard! | बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी घातपाताची शक्यता!

बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी घातपाताची शक्यता!

ठळक मुद्देकिन्ही नाईक बिटमध्ये आढळला होता मृत अवस्थेत वन विभागाने सखोल चौकशी करावी - मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
इसोली : किन्ही नाईक बिटमध्ये  मृत अवस्थेत आढळलेल्या  बिबट्याप्रकरणी घातपात झाला असल्याची चर्चा होत असून, वन  विभागाने सखोल चौकशी करून बिबट्याच्या शिकारीस  कारणीभूत ठरलेल्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
बुलडाणा वन विभागाच्या किन्ही नाईक बिटमध्ये वन विभागाच्या  हद्दीतील नाल्यावरील क्षेत्रात (मादी) बिबट्या मृत अवस्थेत  आढळल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या  बिबट्याचे शवविच्छेदन चिखली तालुका पशुवैद्यकीय उपआयुक्त  डॉ.रंगतवार यांनी केले असून, या बिबट्याचा शवविच्छेदन  अहवाल उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठविल्याचे बुलडाणा  परिक्षेत्राचे वन अधिकारी झोळे यांनी सांगितले. 
बुलडाणा वन विभागामध्ये इसोली बीट, धोत्रा नाईक बीट, किन्ही  नाईक या बीटमध्ये वन विभागाचे क्षेत्र मोठे असल्याने, या भागात  झाडाझुडुपे जास्त असल्याने, तर वन्य प्राण्यांना उन्हाळ्यातसुद्धा  पाण्याची टंचाई भासत नसल्याने या जंगलामध्ये रोही, हरिण तर   गावकर्‍यांच्या चर्चेनुसार ७ ते ८ बिबट असल्याची माहिती आहे.  या १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आलेल्या घटनेनुसार वन  विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मृत पावलेल्या बिबट्याच्या छा तीला जबर मारहाण असल्याचा संशय शवविच्छेदन करण्यासाठी  आलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सदर बिबट्या मृत्यू  हा एक घात असल्याची चर्चा होत असून, चौकशी करण्याची  मागणी होत आहे.  

Web Title: The possibility of death of leopard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.