वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात हालचाली गतिमान होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:30 IST2020-12-24T04:30:09+5:302020-12-24T04:30:09+5:30

बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. मध्यंतरी तीन सदस्यीय समितीनेही पाहणी केली होती. शहरातील तीन जागांचीही पाहणी करण्यात आली ...

Possibility to accelerate the movement towards the establishment of a medical college | वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात हालचाली गतिमान होण्याची शक्यता

वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात हालचाली गतिमान होण्याची शक्यता

बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. मध्यंतरी तीन सदस्यीय समितीनेही पाहणी केली होती. शहरातील तीन जागांचीही पाहणी करण्यात आली होती. सुमारे ४५० कोटी रुपये बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भाने आमदार संजय गायकवाड यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी चर्चा केली. त्यामुळे बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न प्रसंगी मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा आहे. यासंदर्भाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही आ. संजय गायकवाड यांनी यापूर्वी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली होती. आता आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांची या प्रश्नी भेट घेतल्यामुळे बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Possibility to accelerate the movement towards the establishment of a medical college