अनाथ बालिका मातेच्या ताब्यात

By Admin | Updated: July 8, 2016 00:34 IST2016-07-08T00:34:22+5:302016-07-08T00:34:22+5:30

चिखली ग्रामीण रूग्णालयात हरवली होती बालिका.

In the possession of orphaned girl child | अनाथ बालिका मातेच्या ताब्यात

अनाथ बालिका मातेच्या ताब्यात

बुलडाणा: चिखली ग्रामीण रुग्णालयात सापडलेल्या दोन वर्षांच्या मुलीला गुरुवारी तिच्या मातेच्या हवाली करण्यात आले.
पोलीस स्टेशन चिखली अंतर्गत ग्रामीण रुग्णालय चिखली येथे २ जुलै रोजी प्राप्त झालेली अनुजा (वय २ वर्ष) ही मुलगी अंतकला वसंतराव मुरकुले हिच्यासोबत आढळून आलेली होती. अंतकला मुरकुले हिची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी कळविले असता सदर दोन वर्षाच्या बालिकेला पोलीस स्टेशन अधिकारी चिखली यांनी अध्यक्ष बालकल्याण समिती बुलडाणा यांच्या आदेशान्वये पुढील संगोपन व पालनपोषणासाठी ममता शिशु गृह बुलडाणा येथे दाखल करुन घेण्यात आले होते. ७ जुलै रोजी सदर मुलीची आई अंतकला मुरकुले ही स्वत: संस्थेमध्ये येऊन ती सदर मुलीचा सांभाळ करण्यास तयार असल्याचे तिने संस्थेस सांगितले असता संस्थेने मानवतेचा दृष्टिकोन लक्षात घेऊन सदर मुलीस तिच्या मूळ मातेच्या ताब्यात देण्याचे ठरवून अध्यक्ष बालकल्याण समिती बुलडाणा यांच्या आदेशान्वये अनुजा हिला तिच्या मूळ मातेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: In the possession of orphaned girl child