तात्पुरत्या कारागृहातून पोस्कोच्या आरोपीने काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:43 IST2021-04-30T04:43:41+5:302021-04-30T04:43:41+5:30

या घटनेमुळे मात्र प्रशासनात खळबळ उडाली आहे. विनोद श्यामराव वानखेडे (४२) असे आरोपीचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील बाळापूर ...

The POSCO accused escaped from the temporary jail | तात्पुरत्या कारागृहातून पोस्कोच्या आरोपीने काढला पळ

तात्पुरत्या कारागृहातून पोस्कोच्या आरोपीने काढला पळ

या घटनेमुळे मात्र प्रशासनात खळबळ उडाली आहे. विनोद श्यामराव वानखेडे (४२) असे आरोपीचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मांडोली (पो. पान्हेरी) येथील रहिवासी आहे. आरोपी विनोद शामराव वानखेडे याच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपी विनोद वानखेडे हा न्यायालयीन कोठडीत होता. त्याला कोरोना संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील सिंहगड इमारतीत असलेल्या तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र २९ एप्रिल रोजी पहाटे ५:४५ वाजेच्या सुमारास आरोपी शौचालयास गेला असता त्याने तेथील लोखंडी गज तोडून पलायन केले असल्याची तक्रार प्रभारी कारागृह अधीक्षक भी. ना. राऊत यांच्यातर्फे पोलीस कॉन्स्टेबल किरण माने यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक शरद सावळे हे करीत आहेत. दरम्यान गेल्या पाच ते सात दिवसापूर्वी या आरोपीने फिनाईलही प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: The POSCO accused escaped from the temporary jail