तलावातील जलसाठा अत्यल्प
By Admin | Updated: September 7, 2014 00:27 IST2014-09-07T00:27:28+5:302014-09-07T00:27:28+5:30
दुसरबीड परिसरात पावसाची सरासरी कमी; जलस्त्रोत तहानलेलेच.

तलावातील जलसाठा अत्यल्प
दुसरबीड : परिसरात पावसाची सरासरी कमी असल्याने दुसरबीड पाटबंधारे विभागात येणार्या धरणे व तलावातील जलसाठा अत्यल्प आहे.
यावर्षी पावसाची सरासरी कमी असल्याने येथील धरण व तालावांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. मांडवा धरणात १३ टक्के, केशवशिवणी धरणात २२ टक्के, पिंपरखेड ३0 टक्के, गारखेड ३५ टक्के, व तांदुळवाडी तलावात २५ टक्के जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता एन. डी. ठगे यांनी दिली आहे. परिसरात आतापर्यंत केवळ ४९४ मि.मी. पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिना हा शेवटचा टप्प असल्यामुळे पावसाची शक्यता आता कमी आहे.