समृद्धीवर डाळिंबाचा ट्रक उलटला, चालक जखमी
By निलेश जोशी | Updated: June 1, 2024 17:18 IST2024-06-01T17:16:02+5:302024-06-01T17:18:14+5:30
अपघात १ जूनला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक घडला.

समृद्धीवर डाळिंबाचा ट्रक उलटला, चालक जखमी
नीलेश जोशी, डोणगाव : अचानक ब्रेक मारणाऱ्या एका कारला वाचविण्याच्या प्रयत्नात समृद्धी महामार्गावर कोलकत्याकडे डाळिंब घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला. यात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात १ जूनला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक घडला.
नाशिक येथून कोलकात्त्याकडे डब्ल्यूबी-२३-एफ-६५३८ क्रमांकाचा ट्रक डाळिंब घेऊन जात होता. मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळ शेलगाव देशमुख येथील अंडरपासनजीक एका छोट्या कारने वेगाने येऊन ट्रकला अेाव्हर टेक केले आणि लगेच कार चालकाने ब्रेक दाबले. त्यामुळे ट्रक चालकाने कारला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात ट्रकमुळे बाजूचे कठडे तुटले व ट्रक अंडरपासच्या भिंतीवर धडकून उलटला. त्यात ट्रक चालक मोनु सिंग किरकोळ जखमी झाला आहे. पण, ट्रक जर अंडरपासची भिंत तोडून पुलाखाली पडला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. वृत्तलिहिपर्यंत या अपघात प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.