हरितसेनेतर्फे प्रदूषणमुक्त दिवाळी
By Admin | Updated: October 19, 2014 00:01 IST2014-10-19T00:01:30+5:302014-10-19T00:01:30+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील पांग्री उबरहंडे येथील विद्यार्थ्यांनी भरून दिली संकल्प पत्रे.

हरितसेनेतर्फे प्रदूषणमुक्त दिवाळी
बुलडाणा : शरद पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पांगरीच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त दिवाळी फटाके न फोडता व स्वच्छतेविषयी सार्वजनिक संकल्प प्र ितज्ञा घेऊन संकल्पपत्र भरून दिले.
संस्थाप्रमुख प्रा.भीमराव उबरहंडे, उपसंचालक एस.आर.मोरे, प्राचार्य रवींद्र वानखेडे, लागवड अधिकारी एस.टी.फड, एस.एन.लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरितसेना प्रमुख संजय राजपूत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. फटाक्याच्या आवाजामुळे लहान मुलांच्या श्रवण यंत्रावर परिणाम होतो. आगी लागण्याचा धोका, अनेक जीवघेणे अपघात होतात. हे टाळण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प घेतला. फटाक्याचा वापर टाळुण ४0 हजार ५२0 रुपयांची बचत करण्याचे संकल्पपत्र विद्यार्थ्यांनी भरून दिले.