अंगावर वस्तू चिटकण्याची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST2021-06-17T04:24:11+5:302021-06-17T04:24:11+5:30
विविध प्रकारच्या वस्तू अनेकांच्या अंगावर चिटकू शकतात, असे प्रात्याक्षिकांद्वारे समोर आले आहे. अंगावर असलेल्या घामामुळे व वस्तूचा पृष्ठभाग ...

अंगावर वस्तू चिटकण्याची पोलखोल
विविध प्रकारच्या वस्तू अनेकांच्या अंगावर चिटकू शकतात, असे प्रात्याक्षिकांद्वारे समोर आले आहे. अंगावर असलेल्या घामामुळे व वस्तूचा पृष्ठभाग सपाट असल्याने ही क्रिया घडते तसेच भांड्याचा पृष्ठभाग थोडा ओलसर केला तरीसुद्धा वस्तू शरीराला चिटकतात. लसीमुळे अंगात चुंबकत्व निर्माण होते ही बाब अत्यंत चुकीची आहे़ कारण चुंबकाला स्टील चिटकू शकत नाही आणी स्टील चमचे, वाट्या इत्यादी वस्तू चिटकल्याचे व्हिडिओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या हाेत्या. याची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पाेलखाेल केली आहे़ या जगात चमत्कार अस्तित्वात नाहीत. चमत्कारामागे काहीतरी लबाडी असते. आपोआप या जगात काहीच बदल घडत नाहीत. झाडाचे पानसुद्धा हवेचे बळ दिल्याशिवाय हलत नाही, असेही अंनिसने स्पष्ट केले आहे़ केवळ साधीशी ट्रिक वापरून अ. भा अंनिसचे दक्षिण बुलडाणा जिल्हा संघटक दत्ताभाऊ सिरसाट यांनी अंगावर स्टील चमचे, प्लेटा, मोबाईल इत्यादी चिटकवून दाखविले आणि त्या मागील कारणमिमांसा विशद केली़ काेराेना लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले आहे़