ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ‘सुडी’चे राजकारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST2021-02-12T04:32:57+5:302021-02-12T04:32:57+5:30

तालुक्यातील शिंदी हराळी येथील शेषराव भुजंगसिंग मोरे यांनी त्यांच्या सात एकरातील काढणीस आलेल्या शेतातील हरभरा पिकाची गत ५ ते ...

Politics of 'Sudi' after Gram Panchayat elections! | ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ‘सुडी’चे राजकारण!

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ‘सुडी’चे राजकारण!

तालुक्यातील शिंदी हराळी येथील शेषराव भुजंगसिंग मोरे यांनी त्यांच्या सात एकरातील काढणीस आलेल्या शेतातील हरभरा पिकाची गत ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मजुरांमार्फत सोंगणी करून सुडी रचून ठेवली होती.१० फेब्रुवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ती पेटवून दिली. याबाबत मोरे यांना गजानन सिध्देश्वर ढोमणे (रा. खंडाळा मकरध्वज) यांनी माहिती दिली. त्यावरून शेतकरी, त्याचा मुलगा अमोल, नातेवाईक व गावाचे सरपंच सरपंच प्रमोद सपकाळ आणि ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. मात्र तोवर त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते. प्रकरणी शेषराव मोरे (३६) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रा.प. निवडणुकीची किनार !

पोलिसात दाखल तक्रारीत सुडी जाळणाऱ्याचा उद्देश जरी स्पष्ट केला गेला नसला तरी ग्रामपंचायत निवडणूक यास कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. यापूवी स्वाभीमानीचे रविकांत तुपकर यांची सोयाबीनची सुडी राजकीय वादातून जाळल्या गेली आहे. त्या पश्चात आता ग्रा.प.निवडणुकीतील गावकी व भावकीच्या वादातून ही सुडी जाळण्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

(फोटो)

Web Title: Politics of 'Sudi' after Gram Panchayat elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.