बुलडाणा तालुक्यात राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST2021-02-05T08:35:33+5:302021-02-05T08:35:33+5:30
बुलडाणा : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची तीन टप्प्यांत निवडणूक हाेत आहे. ९ ते ...

बुलडाणा तालुक्यात राजकारण तापले
बुलडाणा : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची तीन टप्प्यांत निवडणूक हाेत आहे. ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान ही निवडणूक हाेणार आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर हाेताच राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुकांनी आतापासूनच माेर्चे बांधणी सुरू केली आहे.
बुलडाणा तालुक्यातील दहिद खुर्द व बुद्रूक, देऊळघट, सोयगाव, डोंगर खंडाळा, मासरूळ, मातला, नांद्रा कोळी, रुईखेड टेकाळे, साखळी बुद्रूक, शिरपूर, बिरसिंगपूर, कोलवड, सागवान व तांदूळवाडी येथील सरपंचपदाची निवडणूक ९ फेब्रुवारी राेजी होणार आहे. तसेच १० फेब्रुवारी राेजी अजीसपूर, भडगाव, देवपूर, गुम्मी, चांडोल, जांब, हातोडी बुद्रूक, म्हसला बुद्रूक, पाडली, पलसखेड भट व नागो, पांगरी, रायपूर, सातगाव म्हसला येथील कारभारी निवडले जातील. ११ फेब्रुवारी राेजी डोमरुल, तराडखेड, वरुड, अंभोडा, भादोला, धाड, धामणगाव, जामठी, जनुना, सावळी, कुलमखेड, दुधा, मालवंडी, मालविहिर, मढ, केसापूर, बोरखेड, सिंदखेड येथील सरपंचपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात या निवडणुकींची जय्यत तयारी करण्यात येत आहे, लवकरच सभेचे अध्यासी अधिकारी नेमण्यात येणार आहेत.