रुग्णालयासमोरून पोलिसाची दुचाकी लंपास

By Admin | Updated: June 17, 2017 19:45 IST2017-06-17T19:45:24+5:302017-06-17T19:45:24+5:30

मोताळा ग्रामीण रुग्णालयासमोरून बोराखेडी पोलिसाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली.

Policella bicycle lamps near the hospital | रुग्णालयासमोरून पोलिसाची दुचाकी लंपास

रुग्णालयासमोरून पोलिसाची दुचाकी लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयासमोरून बोराखेडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी नरेश रेड्डी यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. १२ जून रोजी घडलेल्या या घटनेबाबत १६ जून रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बोराखेडी पोलिस स्टेशनचे पो.काँ. नरेश रेड्डी हे १२ जून रोजी त्यांची दुचाकी (क्रमांक एम.एच. २८ एक्स. ४६६५) घेऊन
ग्रामीण रुग्णालयात बंदोबस्तासाठी गेले होते. त्यांनी आपली दुचाकी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उभी केली होती. बंदोबस्त संपल्यानंतर पो.काँ. नरेश रेड्डी दुचाकी उभी केलेल्या जागी आले असता, दुचाकी गायब होती. रेड्डी यांनी ४-५ दिवस शोध घेतला मात्र दुचाकी मिळून न आल्याने १६ जून रोजी त्यांनी बोराखेडी ठाण्यात फिर्याद दिली. दुचाकीचा किंमत ३0 हजार रुपये असून,पुढील तपास नापोकाँ सुनील हिवाळे करीत आहेत.

Web Title: Policella bicycle lamps near the hospital