पोलीस व्हॅन-कारचा अपघात
By Admin | Updated: May 1, 2017 00:33 IST2017-05-01T00:33:00+5:302017-05-01T00:33:00+5:30
हिवरा आश्रम : शेगावला दर्शनासाठी जात असताना मेहकर-चिखली रोडवर लव्हाळा चौफुलीवर पोलीस व्हॅन व कारचा अपघात घडल्याची घटना शनिवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

पोलीस व्हॅन-कारचा अपघात
हिवरा आश्रम : शेगावला दर्शनासाठी जात असताना मेहकर-चिखली रोडवर लव्हाळा चौफुलीवर पोलीस व्हॅन व कारचा अपघात घडल्याची घटना शनिवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
नगर येथील कुटुंब एम.एच.१६ बी.एच. ५००८ क्रमांकाच्या कारने शेगावला दर्शनासाठी जात असताना चिखलीवरुन मेहकरला जाणाऱ्या पोलीस व्हॅन क्र. एम.एच.२८ सी. ६३६७ यामध्ये धडक होऊन पोलीस व्हॅनला दोन पलट्या बसल्या. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, प्रवास करणारे किरकोळ जखमी झाले आहेत. नगर येथील संदीप रामराव इथापे, श्रीदत्त सावळे, राम घुले, ज्योती श्रीदत्त घुले, रविशा संदीप इथापे, अद्वैत्य संदीप इथापे, सेजल श्रीदत्त घुले, कृष्णा घुले हे कारने प्रवास करीत होते. घटना घडताच युवा सेना विभागप्रमुख अमोल कंकाळ, अश्विन लहाने, गजानन लहाने, गणेश गारोळे, राजू लहाने यांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले. घटनेची माहिती कळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अरविंद चव्हाण, कोल्हे हे तपास करीत आहेत.