शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भालेगाव बाजार येथे निश्चित वेळेत भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:31 IST

भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांना चक्क ‘घोडी’ बनवित दंडात्मक कारवाई केली,  तर काही शेतकऱ्यांना मारहाणही करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील भालेगाव बाजार येथे रविवारी सकाळी ९ वाजता भाजी विकणाऱ्या शेतकऱ्यांवर पिंपळगाव राजा पोलिसांची वक्रदृष्टी पडली. भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांना चक्क ‘घोडी’ बनवित दंडात्मक कारवाई केली,  तर काही शेतकऱ्यांना मारहाणही करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या वेळेत शेतकरी भाजी विक्री करीत असतानाही पोलिसांनी कारवाई केल्यामुळे पोलिसांच्या या कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कोरोना या विषाणूच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकाºयांनी मुभा दिली आहे. मात्र, असे असतानाही पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भालेगाव बाजार येथे  सकाळी ९ वाजता पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली. तर काही भाजी विक्रेत्या शेतकºयांना चक्क पोलिसांनी ‘घोडी’बनविले. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत.

भालेगाव बाजार येथे रविवारी सकाळी घडलेल्या प्रकाराची माहिती संबंधितांकडून घेतली जाईल.

 - हेमराजसिंह राजपूत, अप्पर पोलिस अधीक्षक, खामगाव

भालेगाव बाजार येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. बाजार भरविण्याच्या उद्देशाने आलेल्या काही सुरूवातीला पोलिसांनी सोशल डिस्टसिंग पाळण्यास समजावून सांगितले. काही जणांना हटकण्यात आले. मात्र, तरीही ते ऐकत नव्हते. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी  तात्पुरती कारवाई केली.

- सचिन चव्हाण ठाणेदार,

पिंपळगाव राजा, पोलिस स्टेशन

पोलिसांकडून शेतकºयांना अपमानास्पद वागणूक देणे अंत्यत चुकीचे आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांशी अपमानजनक वागणूक अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. याप्रकरणी ठाणेदारांसह संबंधितांना निलंबित करावे, अशी आपली मागणी आहे.

- रविकांत तुपकर शेतकरी नेते, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीPoliceपोलिस