दरोडा प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना

By Admin | Updated: January 12, 2015 23:25 IST2015-01-12T23:25:03+5:302015-01-12T23:25:03+5:30

नांदुरा येथील दरोडाप्रकरण; अटक आरोपींना १७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी.

Police squad to arrest the accused in the Durda case | दरोडा प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना

दरोडा प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना

नांदुरा (बुलडाणा): रविवारी झालेल्या दरोडा प्रकरणातील उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यासाठी नांदुरा पोलिसांचे पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहे. दरम्यान, घटनेनंतर रात्री उशीरा जिल्हा पोलिस अधिक्षक श्याम दिघावकर यांनी घटनास्थळाला भेट देवून पो.स्टे. मध्ये अटक असलेल्या आरोपींची कसून चौकशी केली.
रविवार ११ जानेवारीच्या रात्री ८.३0 वाजेच्या दरम्यान प्रेमचंद प्रकाशचंद झांबड रा.मारवाडी गल्ली नांदुरा हे त्यांच्या मालकीच्या अलंकार ज्वेलर्समध्ये नौकरासह असताना अचानक ७ ते ८ अज्ञात दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करुन बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी प्रेमचंद झांबड यांनी प्रतिकार केला त्यात ते जखमी झाले होते. तो आवाज ऐकून दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या त्यांच्या पत्नी मिना प्रेमचंद झांबड यांनी समय सुचकता दाखवत त्वरीत पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. यावेळी आरोपी मजहर खान गोहरखान ( २७ ) याला घटनास्थळी पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अन्य अज्ञात आरोपींपेकी ज्ञानगंगा नदी पुलाजवळ रवि विनोद बडोले (२४) याला पकडण्यात यश आले. इतर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी आरोपी कडून एक बंदुक चार जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. दरम्यान आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
याप्रकरणी अप नं.६/१५ भादवि ३,२५ आर्म अँक्ट कलम ५ स्पोटक पदार्थ अधिनियम १९0८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, दरोड्यातील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Police squad to arrest the accused in the Durda case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.