दारुसह ५५ हजारांचा ऐवज पोलिसांकडून जप्त
By Admin | Updated: July 14, 2017 23:55 IST2017-07-14T23:55:19+5:302017-07-14T23:55:19+5:30
मलकापूर : पोलिसांनी ४२ दारुच्या बाटल्यांसह एका आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेऊन ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दारुसह ५५ हजारांचा ऐवज पोलिसांकडून जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : पोलिसांनी ४२ दारुच्या बाटल्यांसह एका आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेऊन ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १४ जुलै रोजी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी दसरखेड फाटा येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास केली. या प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
प्राप्त गोपनीय माहितीवरून दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी पोनि. माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर मुक्ताईनगर ते धरणगाव दरम्यान नाकाबंदी केली होती. यावेळी दसरखेड फाटा येथे वामन मधुकर कवळे (वय ४७) रा. धरणगाव या आरोपीकडून व्हीस्कीच्या प्रत्येकी ७५० एमएलच्या १५ हजार १२० रुपये किमतीच्या ४९ सीलबंद प्लास्टिक बॉटल मोठ्या थैलीसह जप्त केल्या. त्याचप्रमाणे ४० हजार रुपये किमतीची हीरो होण्डा स्प्लेंडर ही दुचाकीसुद्धा जप्त केली. असा एकंदर ५५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला. ही कारवाई पोहेकाँ सुभाष पहुरकर, नापोकाँ संजय निंबोळकर, प्रमोद पोलाखरे, आनंद माने, चालक आदींनी पार पाडली. यानंतर याप्रकरणी नापोकाँ दिलीप रोकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले.