चोरट्यांच्या शोधात पोलीस मध्यप्रदेशात

By Admin | Updated: November 23, 2015 01:21 IST2015-11-23T01:21:03+5:302015-11-23T01:21:03+5:30

मोबाइल टॉवरच्या बॅटरी लंपास प्रकरणी सोनाळा पोलीसांचे पथक मध्यप्रदेशात दाखल.

Police in search of thieves in Madhya Pradesh | चोरट्यांच्या शोधात पोलीस मध्यप्रदेशात

चोरट्यांच्या शोधात पोलीस मध्यप्रदेशात

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडणापूर येथून मोबाइल टॉवरच्या बॅटरी लंपास झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणातील उर्वरित आरोपींच्या शोधासाठी सोनाळा पोलीस ठाण्याचे पथक मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्याकडे २२ नोव्हेंबर रोजी रवाना झाले. येथील मोबाइल टॉवरच्या बॅटरी लंपास केल्याप्रकरणी सोनाळा येथील ठाणेदार सचिनसिंह परदेशी यांच्या पथकाने पाचपैकी दोन आरोपींना २१ नोव्हेंबर रोजी अटक करून त्यांच्याकडील चारचाकी वाहन जप्त केले होते. या घटनेतील उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी सोनाळा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक गजानन जोशी, हेड कॉन्स्टेबल कोल्हे व राठोड यांचे पथक खरगोनकडे रवाना झाले आहे. या चोरट्यांकडून इतर ठिकाणच्या चोर्‍यासुद्धा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Police in search of thieves in Madhya Pradesh