कुजलेल्या अवस्थेत मिळाला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मृतदेह
By Admin | Updated: May 31, 2017 13:59 IST2017-05-31T13:59:03+5:302017-05-31T13:59:03+5:30
पोलिस हेड कॉन्सटेबल रमेश शिवाजी मिसाळकर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बुधवारी बोराखेडी येथील घरामध्ये आढळून आला.

कुजलेल्या अवस्थेत मिळाला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मृतदेह
मोताळा: तालुक्यातील बोराखेडी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्सटेबल रमेश शिवाजी मिसाळकर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बुधवारी बोराखेडी येथील साई नगरमधील पोलिस कर्मचारी चिखली येथे असलेल्या सुषमा उईके यांच्या नविन बांधकाम सुरु असलेल्या घरामध्ये आढळून आला. बोराखेडी येथील वार्ड नं. 5 मधील साई नगरमधील रहिवासी महिला सकाळी 8 वाजता नळ पाणी भरण्यासाठी गेल्या असता बाजूलाच असलेल्या पोलिस कर्मचारी सुषमा उइके यांच्या नविन
बांधकाम होत असलेल्या घरामधून दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत असल्याची माहिती महिलांनी गावतीलच ग्रामपंचायत सदस्य असलेले सुनीलआत्माराम तेलंग यांना दिली. तेलंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता घरातून मोठ्या प्रमानात दुर्गंधी येत असल्यामुळे बोराखेडी पोलिस
स्टेशनला फिर्याद दाखल केली. घटना स्थळी बोराखेडी पोलिसांनी चौकशी केली असता घरामध्ये पोलिस हेड कॉन्सटेबल रमेश शिवाजी मिसाळकर यांचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मिना व बी बी महामुनी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मृत्यचे कारण अद्याप समजू शकले नाही. ग्रामपंचायत सदस्य सुनील तेलंग यांच्या फिर्यादी वरुण बोराखेडी पोलिसांनी 174 भादवी नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार सुनील हुंड हे करीत आहे.