पोलिसांनी केला साडेसात लाखाचा गुटखा नष्ट

By Admin | Updated: September 6, 2016 02:10 IST2016-09-06T02:10:35+5:302016-09-06T02:10:35+5:30

डोणगाव पोलीस स्टेशनची कारवाई.

Police looted the gutkha of lathas in a lane | पोलिसांनी केला साडेसात लाखाचा गुटखा नष्ट

पोलिसांनी केला साडेसात लाखाचा गुटखा नष्ट

डोणगाव(जि. बुलडाणा), दि. ५ : डोणगाव पोलीस स्टेशनने उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनात अवैध गुटख्यावर कारवाई करून सात लाख सत्यांशी हजार नऊशे रुपयांचा गुटखा पकडला होता. तो पोलीस स्टेशन डोणगाव येथे जप्त करून ठेवण्यात आला होता. पोलीस स्टेशनने अन्न व पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करून ४ सप्टेंबरला पकडलेला गुटखा आरेगाव रोडने नेऊन एका गड्डय़ात पेटवून नष्ट करण्यात आला. गुटखा नष्ट करतेवेळी पोहेकाँ ठाकरे, इंगळे, चालक अंभोरेसह पंच राहुल दशरथ वानखेडे व दगडू भानुदास चिपडे, रा.नायगाव दत्तापूर यांच्या समक्ष सदर गुटखा नष्ट करण्यात आला.

Web Title: Police looted the gutkha of lathas in a lane