शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

विना नंबरप्लेटच्या वाहनांवर पोलिसांची ‘गांधीगिरी’!, दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 13:26 IST

विना नंबरप्लेटचे वाहन चालविणाऱ्या अनेक वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी बुधवारी शहर पोलिसांनी अभियान राबविले.

खामगाव:  विना नंबरप्लेटचे वाहन चालविणाऱ्या अनेक वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी बुधवारी शहर पोलिसांनी अभियान राबविले. पहाटेपासून विना नंबरप्लेटच्या गाड्या पकडण्यात आल्या. या गाड्या शहर पोलिस स्टेशनमध्ये लावून त्यांच्यावर पेंटरकडून नंबर टाकण्यात आले. सोबतच या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसाच्या या गांधीगिरी अभियानामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.खामगाव शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घातल्यानंतर शहर पोलिसांनी बुधवारी आपला मोर्चा विना नंबरप्लेटच्या दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडे वळविला. शहर पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मुख्य रस्त्यावर तसेच विविध चौकातून विना नंबर प्लेटची अनेक वाहने ताब्यात घेतली. ही वाहने पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आली. वाहन खरेदी करून तीन-चार महिने उलटल्यानंतरही वाहनावर नंबर न टाकणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल २३ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये वाहतूक शाखेचे एएसआय अरविंद राऊत, मार्गरेट हंस, योगेश चोपडे, संजय इंगळे, हागे, टेकाळे, नागरे यांनी ही कारवाई केली.

फॅन्सी नंबरप्लेटवालेही रडारवर!विना नंबर प्लेट वाहन धारकांसोबतच वाहनांवर आकर्षक नंबर टाकणारे वाहन धारकही पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते. बुधवारी विना नंबरप्लेटची मोहिम राबविल्यानंतर गुरूवारी फॅन्सी नंबरप्लेट धारकांविरोधात मोहिम उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, विना नंबर प्लेटची कारवाई करण्यात आलेल्या वाहन धारकाने वाहनावरील नंबर खाडाखोड अथवा मिटविल्याचे आढळून आल्यास त्याचेवर मोटार वाहन कायद्यानुसार कलम २३६/१७७ अन्वये दोन हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे बेशिस्त आणि नियम मोडणाºया वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे.वाहनांवर नंबर न टाकणाºया तसेच कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांविरोधात वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहर पोलिस स्टेशनमध्ये विना नंबर प्लेटची वाहने लावण्यात येत आहे. या वाहनांवर वाहनचालकांना नंबर टाकून दिल्या जात आहे. हा नंबर मिटविल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.

- संतोष टाले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन खामगाव.