शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी केले त्याच्यातील ‘रावणा’चे हरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 23:18 IST

खामगाव: ‘व्हॅलेंटाईन’ डे पडला महागात

अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील एका विद्यालयात विद्यार्थीनीला ‘व्हॅलेंटाईन’ डेच्या दिवशी ‘प्रपोज’करणे एका युवकाच्या चांगलेच अंगलट आले. शाळेच्या आवारात जाऊन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगासोबतच अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला.

 शहरातील शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका नामांकित शाळेत विद्यार्थीनीसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्वच विद्यार्थीनी जमल्या होत्या. या कार्यक्रमा दरम्यान एक युवक आपल्या मित्रांसोबत शाळेच्या आवारात शिरला. कार्यक्रम सुरू असतानाच त्याने एका विद्यार्थीनीला इशारा केला. विद्यालयातील एकांताचा सहारा घेत, आपल्या हातातील गुलाब पुष्प त्या मुलीला देण्याचा प्रयत्न केला. तितक्यात विद्यालयाच्या आवारातील  विद्यार्थीनीच्या निदर्शनास ही बाब पडताच, त्यांनी आरडाओरड केल्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबियांना माहिती पडली. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता तेही शाळेत दाखल झाले. प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. अखेरीस मुलीच्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी मुलांविरोधात भादंवि कलम ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

युवकाची दादागिरी!मुलींच्या विद्यालयात मुलांना जाण्यास बंदी असताना अतिशय सिनेस्टाईल पध्दतीने  आपल्या मित्रांना सोबत घेत, शाळेत प्रवेश मिळविला. तेथे विद्यार्थीनीला गुलाबपुष्प देत तिचा विनयभंग केला.  ऐन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा प्रकार घडल्याने पोलिसांनी त्याच्यातील ‘रावणा’चे गर्वहरण केले.

युवका विरोधात अ‍ॅट्रासिटीतंर्गतही गुन्हा!शाळेच्या आवारात घुसून एका विनयभंग करणाºया युवका विरोधात शुक्रवारी उशीरा रात्री पोलिसांनी अ‍ॅट्रासिटीतंर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एका विद्यालयातील विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एका युवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात अ‍ॅट्रासिटी कायद्यातंर्गतही गुन्ह्याची नोंद केली आहे. मुलीच्या विद्यालयात विना परवानगी घुसून त्याने आपल्यातील मग्रुरीचे दर्शन घडविले. पोलिस त्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करतील.- प्रदीप पाटीलउपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेPoliceपोलिस