पोलीस दादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:07+5:302021-04-25T04:34:07+5:30

१६ मार्च पासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण सुरू झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलिसांनाही प्राधान्यक्रमाने कोरोनाची लस देण्यात आली. ...

Police grandfather, take care of your own health too | पोलीस दादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या

पोलीस दादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या

१६ मार्च पासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण सुरू झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलिसांनाही प्राधान्यक्रमाने कोरोनाची लस देण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात २,६०४ पोलीस कर्मचारी आणि १८८ पोलीस अधिकारी आहेत. यापैकी पहिला डोस ८७ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आला असून लसीचा दुसरा डोस आतापर्यंत ५३ टक्के पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. अद्यापही १३ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून टप्प्याटप्प्याने ते होत आहे.

--बाबा आम्ही घरी वाट पाहतोय---

१) माझे बाबा पोलीस आहेत. गेल्या वर्षभरापासून रात्री-बेरात्रीही त्यांना कामावर जावे लागते. प्रत्यक्ष फिल्डवर ते राहत असल्याने आम्हाला कोरोना होईल या भीतीने ते आमच्या जवळही येत नाही. माझे आजोबाही मध्यंतरी वारले. दोन दिवसांची त्यांची तेरवी आहे. या स्थितीतही माझे बाब कर्तव्यावर गेले. ते घरी येण्याची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहतो.

(प्रफुल्ल सुनील दळवी, बुलडाणा)

२) माझे बाबा बुलडाणा पोलीस शहर ठाण्यात कार्यरत आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतची त्यांना बारिकसारीक माहिती ठेवावी लागते. नेहमीच ते कामात असतात. त्यामुळे आम्हाला वेळ ही त्यांना देता येत नाही. कोरोनामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.

(हर्षल गजानन लहासे, बुलडाणा)

३) जिल्हा मुख्यालयामध्ये माझे बाबा काम करतात. कोरोनाच्या बंदोबस्तामुळे त्यांची घरी येण्याची निश्चित अशी वेळ नाही. ते केव्हा घरी येतील याची आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो.

(प्रज्वल रवींद्र डुकरे)

--लसीकरण--

एकूण पोलीस:- २,६०४

एकूण पोलीस अधिकारी--१८८

पहिला डोस घेणारे पोलीस :- २,४३८

पहिला डोस घेणारे अधिकारी:- १७२

दुसरा डोस घेणारे पोलीस:- १,३६९

दुसरा डोस घेणारे अधिकारी-- १०१

-- जिल्ह्यातील ३९५ पोलीस कर्मचारी बाधित--

एकूण कोरोना बाधित पोलीस:- ३५४

सध्या उपचार सुरू असलेले पोलिस:- ५७

एकूण कोरोना बाधित पोलीस अधिकारी:- ४१

सध्या उपचार सुरू असलेले पोलीस अधिकारी:-०८

मृत्यू:- ०२

Web Title: Police grandfather, take care of your own health too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.