‘त्या’ पोलिस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: July 12, 2014 00:15 IST2014-07-11T23:49:06+5:302014-07-12T00:15:29+5:30
चिडीमार पथकातील शिपायाविरूद्धच विनयभंगाचा गुन्हा दाखल. त्या शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘त्या’ पोलिस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न
बुलडाणा : पोलिसांच्या चिडीमार पथकातील विष्णू गाडेकर याने माझा विनयभंग केला. अशी तक्रार एका पिडीत मुलीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली होती. त्यामुळे घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलिस कॉस्टेबल विष्णु गाडेकर याच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी तपास सुरु असताना काल १0 जुलैच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध प्राशन करुन गाडेकर याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे उपचार सुरु आहे.
सदर कर्मचारी हा २0१0 च्या पोलिस भरती प्रक्रियेतून पोलिस दलात भरती झाला होता. पोलिस प्रशिक्षणानंतर काही दिवस जिल्हा पोलिस मुख्यालयात त्याने काम केले. मागील १0 महिण्यापासून पूर्वी त्यांची बुलडाणा शहर पोलिसात बदली करण्यात आली. सद्या त्याच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपाची तपासणी पोलिस करीत आहे. तर आरोप करणार्या पिडीत मुलींची आज शुक्रवारी वैद्यकिय तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.