अपहारप्रकरणी पोलिसाला शिक्षा
By Admin | Updated: July 31, 2015 23:07 IST2015-07-31T23:07:06+5:302015-07-31T23:07:06+5:30
शासकीय रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस ठोठावली तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १0 हजाराचा दंड.

अपहारप्रकरणी पोलिसाला शिक्षा
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तामगाव पो.स्टे. मधील हेड मोहरर पदावर कार्यरत असताना शासकीय रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी संग्रामपूर येथील न्यायालयाने प्रकाश दंडे यास ३ वर्ष सक्तमजुरी व १0 हजार दंड ठोठावला. पो.स्टे. मधील हेड मोहरर प्रकाश दंडे याने २४ एप्रिल २00७ ते ८ मार्च २00८ या कालावधीत पोलीस कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी, वीज तसेच पेट्रोल बिलाची रक्कम असा एकूण २ लाख ५ हजार ४४0 रुपयांचा वापर स्वत:साठी केला. ही बाब लेखा परीक्षणात उघडकीस आल्यानंतर तत्कालीन डीवायएसपी चिंतामण सोळंके यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून दंडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. सर्व पुराव्याअंती न्या. धपाटे यांनी दंडे यास शिक्षा ठोठावली आहे.