पोलीस विभागाच्यावतीने व्हॉलीबॉल सामन्यांचे उद्घाटन
By Admin | Updated: August 2, 2016 01:23 IST2016-08-02T01:23:42+5:302016-08-02T01:23:42+5:30
खामगाव येथील व्हॉलीबॉल स्पर्धांंमध्ये उपविभागातील १७ संघांचा सहभाग.

पोलीस विभागाच्यावतीने व्हॉलीबॉल सामन्यांचे उद्घाटन
खामगाव (जि. बुलडाणा): जातीय सलोखा वृध्दींगत व्हावा यासाठी १ ते ३ ऑगस्ट दरम्यान पोलिस विभागाच्यावतीने येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित हॉलीबॉल स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव बावीस्कर यांच्या संकल्पनेतून आयोजित या सामन्यांचे उदघाटन अप्पर पोलिस अधीक्षक यशवंतराव सोळंके यांच्याहस्ते करण्यात आले. सदर सामन्यांमध्ये पासिंग बॉल प्रकारात पोलिस मित्र मंडळ खामगाव, साई नगर वाडी, अंजुमन हायस्कूल शेगाव, गणेश मंडळ खामगाव, पो.स्टे.खामगाव शहर, क्रीडा संकूल खामगाव, चंदनशेष क्रीडा मंडळ खामगाव, आरसीपी पथक, टिचर्स मंडळ खामगाव, पो.स्टे.पिं.राजा या संघांनी तर शूटिंग बॉल प्रकारात इगल क्लब नांदुरा, अंजुमन क्रीडा मंडळ खामगाव, पो.स्टे.खामगाव शहर, साई नगर वाडी, जलंब रेल्वे, समता क्रीडा मंडळ खामगाव, जागृती क्रीडा मंडळ खामगाव या संघांनी भाग घेतला. सोमवारी पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये अंजुमन हायस्कूल शेगाव, साई क्रीडा मंडळ वाडी, क्रीडा संकूल खामगाव, जलंब रेल्वे, साई नगर वाडढी हे संघ विजयी झाले. अंतिम सामन्यात विजयी होणार्या पहिल्या तीन संघांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या सामन्यांचे उदघाटनप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार संतोष टाले, नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, शांतता समिती सदस्य अशोक सोनोने, शेखर पुरोहित, कमरुजमा, रामदादा मोहिते यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक व युवकांची उपस्थिती होती. या सामन्यांचे आयोजन खामगाव शहर पो.स्टे.चे ठाणेदार डी.डी.ढाकणे व पोलिस कर्मचार्यांनी केले आहे. संचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले.