बालगृहातील लैंगिक शोषणप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:50 IST2017-09-09T00:49:28+5:302017-09-09T00:50:21+5:30

Police custody of accused in sexual harassment case | बालगृहातील लैंगिक शोषणप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

बालगृहातील लैंगिक शोषणप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

ठळक मुद्दे मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कनिष्ठ काळजीवाहक अटकआरोपीस ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथील चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह तथा बालगृहातील दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केलेल्या कनिष्ठ काळजीवाहक आरोपीस ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
बुलडाणा-चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह तथा बालगृहात २७ ऑगस्ट रोजी आरोपी नवृत्ती बारीकराव राजपूत याने १६ व २३ वर्षीय युवकासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच याची वाच्यता कुठेही न करण्याची धमकीही दिली; मात्र मुलांनी याबाबत रिमांड होमचे अधीक्षक  बी. एल. राठोड यांच्याकडे तक्रार केली. राठोड यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आपल्या वरिष्ठांना कळविले. या प्रकरणी  वरिष्ठ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी.एस. एंडोले यांनी पाच सदस्यांची समिती नियुक्त करून या प्रकरणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. दरम्यान, समितीने या प्रकरणाची तपासणी करीत राजपूत यांच्या विरोधात अनेक पुरावे मिळवून अधीक्षकांसमोर सादर केले.  त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीनंतर नवृत्ती राजपूतवर कलम ३७७ अन्वये तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत आयपीसी सह कलम ८ अंतर्गत व पास्को कायदा २0१0 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी नवृत्ती राजपूतला गुरुवारी सायंकाळी अटक केली. दरम्यान, शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Police custody of accused in sexual harassment case