खूनप्रकरणी पोलीस कोठडी
By Admin | Updated: September 4, 2015 00:31 IST2015-09-04T00:31:23+5:302015-09-04T00:31:23+5:30
पत्नीची केली हत्या ; देवधाबा येथील घटना.
_ns.jpg)
खूनप्रकरणी पोलीस कोठडी
मलकापूर (जि. बुलडाणा) : परपुरूषाशी अनैतिक संबंध असल्याचे आरोपावरून स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खुन केल्याप्रकरणी आरोपी पतीला येथील न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश २ रोजी दिलेत. देवधाबा येथे प्रकाश दामोधर गलवाडे (वय ४३) ह्याने पत्नीच्या चरित्र्यावर संशय आरोप करीत तीचा गळा आवळून खून केल्याची घटना १ रोजी घडली. याप्रकरणी मृतक शारदा प्रकाश गलवाडे (वय ३२) यांची बहीण डिंपल पाटील (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश गलवाडे विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला व त्याचबरोबर आरोपीला गजाआड करण्यात आले. २ रोजी प्रकाश गलवाडे याला न्यायालयात उभे करण्यात आले. पोलिसांची बाजु ऐकुन प्रथम वर्ग न्यायाधिश आर.आर. खान यांनी आरोपीला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिले.