खूनप्रकरणी पोलीस कोठडी

By Admin | Updated: August 14, 2015 23:38 IST2015-08-14T23:38:03+5:302015-08-14T23:38:03+5:30

मलकापूर येथील बालकाचा संशयास्पद मृत्यूप्रकरण.

Police cell murderer | खूनप्रकरणी पोलीस कोठडी

खूनप्रकरणी पोलीस कोठडी

मलकापूर (जि. बुलडाणा) : संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आलेल्या बालकाच्या मृत्यूप्रकरणी मातेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या खून प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ह्यत्याह्ण आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी सायंकाळी मलकापूर येथील इदगाह मैदानाजवळील शेतशिवारात इयत्ता तिसर्‍या वर्गात शिकणारा कैफखान कलीमखान हा दहा वर्षीय बालक मृतावस्थेत आढळून आला. बालकास रुग्णालयात नेण्यात आले असता, तो मृत असल्याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी मृत बालकाची आई रेहानाबी हिने माझ्या १0 वर्षीय मुलास किरकोळ वादातून शेजारी राहणार्‍या शे.अजीज शे.मजीद (वय ३५) यानेच रूमालाच्या सहाय्याने गळा दाबून मारल्याची तक्रार गुरुवारी रात्री उशिरा मलकापूर पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रात्रीच आरोपी शे.अजीज शे.मजीद रा.मुश्ताक अली नगर याचेविरूद्ध अप.नं.१२६/१५ कलम ३0२ भादंवि अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यास तत्काळ अटक केली. १४ ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास १८ ऑगस्टपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Police cell murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.