शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पासेससाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसाकडून बेदम मारहाण; विद्यार्थी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 21:01 IST

पालकांसह प्रवाशांनी व्यक्त केला रोष 

खामगाव :  बसच्या सवलत दरातील पासेससाठी येथील बसस्थानकावर आलेल्या एका विद्यार्थ्यास पोलिस कर्मचाऱ्याकडून काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना २२ ऑगस्टरोजी घडली. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याचे डोके फुटल्यानंतरही त्यास १० ते १५ फूट फरफटत नेण्यात आल्याने उपस्थित प्रवाशांसह पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

इयत्ता पाचवी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासेसची सुविधा राज्य परिवहन महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप विद्यार्थी पासेस पासून वंचित असल्याचे वास्तव आहे. खामगाव आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे हे निलंबित झाल्याने येथील कारभार वाऱ्यावर आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून एसटी कार्यशाळेतील अधिकारी पवार यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. मात्र त्यांनाही दोन प्रभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुुळे पासेस वितरीत करण्याचा कार्यक्रम सध्या प्रभावित झाला आहे. यातून २२ ऑगस्टरोजी सकाळी ६.३० वाजता विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांनी गदारोळ झाल्याने एका विद्यार्थी चक्कर येवून खाली पडला. यामुळे इतर विद्यार्थी घाबरून पळू लागले. तेवढ्यात ड्युटीवर उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याने खाली पडलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस न करता उलट त्यास काठीने मारहाण केली. त्याचे डोके फुटल्याने विद्यार्थी सांगत असताना त्याकडेही दुर्लक्ष करीत त्यास १० ते १५ फुट फरफटत नेण्यात आले. हा संतप्त प्रकार सुरु असतानाही बसस्थानकावर उपस्थित काही प्रवाशांनी धाव घेत कक्षातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र पोलिसांशी आमचा काहीही संबध नाही असे उत्तर मिळाले. या प्रकाराचा विद्यार्थी, विद्यार्थीनींनी निषेध नोंदवला आहे. 

संतप्त विद्यार्थ्यांची आगार व्यवस्थापकांकडे तक्रार पासेस मिळण्यासाठी होत असलेली दिरंगाई व पोलिसाकडून होत असलेल्या दादागिरीबाबत विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकाकडे २२ ऑगस्टरोजी लेखी तक्रार केली. दहा दहा दिवस रांगेत लागून पास मिळत नाही. रात्री १२ वाजेपासून मुले रांगेत लागतात. तिथेच झोपतात. पास काढून देणाऱ्या कर्मचाऱ्यास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना होणारी गैरसोय कळवली असतानाही त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतल्या जात नसल्याचे सांगण्यात आले. पास नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जादा पैसे देवून शहराच्या ठिकाणी यावे लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

खामगाव बसस्थानकावर घडलेला प्रकार गंभीर आहे. विद्यार्थ्यांना चांगली सेवा देता यावी साठी सध्या दोन काऊंटर सुरु करण्यात आले आहेत. विद्यार्थी एकाचवेळी आल्याने गर्दी होत असल्याने काही प्रमाणात गोंधळ होतो. त्यावर प्रभारी स्थानकप्रमुखांशी बोलून निश्चित तोडगा काढण्यात येवून काऊंटर वाढवण्याच्या सुचना देतो.  - संजय रायलवार, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ बुलडाणा