पोलिसांनी पकडला ३0 हजारांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:12 IST2017-08-19T00:11:58+5:302017-08-19T00:12:01+5:30
खामगाव : महिंद्रा पिकअपमधून नेण्यात येणारा गुटखा शिवाजीनगर पोलिसांनी पकडल्याची घटना एमआयडीसीमधील विकमसी कंपनीजवळ घडली. या कारवाईत पोलिसांनी ३0 हजारांचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे.

पोलिसांनी पकडला ३0 हजारांचा गुटखा
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : महिंद्रा पिकअपमधून नेण्यात येणारा गुटखा शिवाजीनगर पोलिसांनी पकडल्याची घटना एमआयडीसीमधील विकमसी कंपनीजवळ घडली. या कारवाईत पोलिसांनी ३0 हजारांचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला एमआयडीसी भागातून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी गुरुवारी रात्री एमआयडीसीमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. दरम्यान, महिंद्रा पिकअप क्रमांक एमएच २८ एबी ३८0३ या वाहनामध्ये शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटख्याचे तीन पोते (अंदाजे किंमत ३0 हजार) मिळून आले.
यावेळी पोलिसांनी चालक राजू गव्हांदे रा. शंकर नगर यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळून गुटखा व गाडी जप्त करून त्यास पुढील कारवाईकरिता अन्न व औषध पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. शहर पोलिसांपाठोपाठ शिवाजीनगर पोलिसांनीही गुटखाविरोधी मोहीम उघडली आहे.