विष प्राशन करून घेतला गळफास
By Admin | Updated: September 17, 2015 23:19 IST2015-09-17T23:19:53+5:302015-09-17T23:19:53+5:30
मातोळा तालुक्यातील घटना.

विष प्राशन करून घेतला गळफास
मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील शेलापूर नवीन येथील २९ वर्षीय तरूणाने विषारी द्रव्य प्राशन केल्यावर निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी १२ वाजेदरम्यान उघडकीस आली. शिवाजी विजय तायडे (वय २९) रा. शेलापूर नवीन असे मृतकाचे नाव आहे. शेलापूर येथील प्रशांत प्रभाकर खर्चे हे आज दुपारी शेतात गेले असता, त्यांना निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतक आढळून आला. घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार नारनवरेसह बिट जमादार व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृतकाच्या बाजूला विषारी द्रव्याची बाटली व दुचाकी आढळून आली. चौकशी दरम्यान मृत शिवाजी तायडे याने १६ सप्टेंबरच्या रात्री ८:३0 वाजेच्या सुमारास प्रथम विषारी द्रव्य प्राशन करून नंतर निंबाच्या झाडाला गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी र्मग कायम केला असून, अधिक तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहे.