गावाच्या वेशींची दुर्लक्षामुळे दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:40+5:302021-09-24T04:40:40+5:30

माजी सरपंच केशव बळीराम सरकटे यांनी ग्रामपंचायतीस २७ जून रोजी लेखी निवेदन सादर करून प्रवेशद्वाराची दुरुस्तीची मागणी केली होती. ...

Plight due to neglect of village gates | गावाच्या वेशींची दुर्लक्षामुळे दुर्दशा

गावाच्या वेशींची दुर्लक्षामुळे दुर्दशा

माजी सरपंच केशव बळीराम सरकटे यांनी ग्रामपंचायतीस २७ जून रोजी लेखी निवेदन सादर करून प्रवेशद्वाराची दुरुस्तीची मागणी केली होती. जगप्रसिद्ध लोणार सरोवर (कुंड) च्या पायाथ्याशी असल्याने देऊळगाव कुंडपाळ गावात प्रवेशासाठी दोन मोठी प्रवेशद्वार आहेत. सद्यस्थितीत पंचायतीच्या व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे प्रवेशद्वाराकडे दुर्लक्ष झालेले असल्याने मोठ्या प्रमाणावर वेशींची पडझड झालेली आहे. मागील वर्षी सरपंच लता भगवान नागरे यांनी पुढाकार घेऊन प्रवेशद्वाराचे जतन करण्यासाठी प्रवेशद्वारावर प्लास्टिक टाकून वेशीचे संरक्षण केले होते.

पंचायत समितीने नाही घेतली दखल

सांप्रत स्थितीत हनुमान मंदिरासमोरील प्रवेशद्वार हे गावात प्रवेशाचे व निर्गमनाचे प्रमुख ठिकाण आहे. ते प्रवेशद्वार पडण्याच्या स्थितीत असल्याने त्याचे खालून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांच्या जीवित्वाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ग्रा.प.ने गटविकास अधिकारी पंचायत समितीला प्रवेशद्वाराच्या दुरस्तीबाबत कळविले आहे. निवेदन देऊन ४ महिने झाले असले तरी अद्यापपर्यंत लोणार पंचायत समिती व ग्रामपंचायतींकडून वेशीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. वेश पडून जीवित हानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल माजी सरपंच केशव सरकटे यांना उपस्थित केला आहे.

Web Title: Plight due to neglect of village gates