अनुराधा अभियांत्रिकीत दुसऱ्या टप्प्यात २५० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:36 IST2021-07-27T04:36:36+5:302021-07-27T04:36:36+5:30
मुंगसाजी महाराज मंदिर परिसर अनुराधानगर येथे पार पडलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या ...

अनुराधा अभियांत्रिकीत दुसऱ्या टप्प्यात २५० वृक्षांची लागवड
मुंगसाजी महाराज मंदिर परिसर अनुराधानगर येथे पार पडलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी १३ जुलै रोजी पहिल्या टप्प्यात २५० विविध वृक्षांचे कोविड केअर हॉस्पिटल येथे वृक्षारोपण करण्यात आले होते. कोरोनाला परतवून लावल्यानंतर कदाचित कृत्रिम ऑक्सिजनची इतकी गरज भासणार नाही. परंतु, नैसर्गिक ऑक्सिनची गरज पूर्ण करण्याकरिता आजच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून भविष्याची पायाभरणी करण्याकरिता वृक्षारोपण व संगोपन ही काळाची गरज आहे, असे मत राहुल बोंद्रे यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी संस्थेचे विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, डॉ. राजेश मापारी, विजय गुरूदासानी, उमेश मोहोड, प्रा. धिरज व्यवहारे आदी उपस्थित होते.