जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:39+5:302021-09-26T04:37:39+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केमिस्ट प्रकाश मेहेत्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटनेचे संघटन सचिव ढोरे पाटील, प्रशांत ढोरे ...

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त वृक्षारोपण
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केमिस्ट प्रकाश मेहेत्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटनेचे संघटन सचिव ढोरे पाटील, प्रशांत ढोरे पाटील, विनोद नागवानी, जनाभाऊ घुबे, चिखली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल तायडे हे होते. फार्मासिस्ट हा समाजातील सेवाभावी घटक आहे. ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देण्यात यावी, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मेहेत्रे यांनी यावेळी केले. राजाभाऊ व्यास यांनी फार्मसी दिनाविषयी माहिती दिली. चिखलीचे केमिस्ट अभय साखरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान, वृक्षारोपण करून फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुचित भराड यांनी केले. आभार सर्जेराव भुते यांनी मानले. यावेळी सुनील पारस्कर, बद्री पानगोळे, दीपक खरात, गजानन भुते, प्रकाश जाधव, नीरज लड्डा, प्रदीप हाके, विनोद लद्धड, सुशांत तायडे, राजेश चांडक, राजेश गोंदणे, किशोर बडे, आशिष अपराजित, स्नेहल वानखेडे, सचिन जगताप, पंकज लंबे, निखिल, राहुल सावजी, शरद चिंचोले, भास्कर मापारी, विजय सवडतकर, प्रणव लद्धड, नीलेश साखळकर, गजानन शेजवळ, ऋषिकेश खंडागळे, श्रीकांत सोळंकी, पवन सावळे, प्रवीण शेळके, राहुल गवडे, रंगराव पाटोळे, विजय वायाळ, भरत खंडागळे, विजय डुकरे, सागर सोळंकी, हितेश गुरुदास, पवन इंगळे, तुषार पाटील, संदीप वाघमारे, विकास मोरे आदी फार्मसिस्ट उपस्थित होते.