अंढेरा येथील एकता ध्वजाजवळ वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:15+5:302021-07-15T04:24:15+5:30

ध्वजाजवळ सकाळी १० वाजता सामूहिक पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. स्थानिक अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत ...

Plantation near Ekta Dhwaj at Andhera | अंढेरा येथील एकता ध्वजाजवळ वृक्षारोपण

अंढेरा येथील एकता ध्वजाजवळ वृक्षारोपण

ध्वजाजवळ सकाळी १० वाजता सामूहिक पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. स्थानिक अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले यांचे प्रतिनिधी पोहेकाॅ. गजानन वाघ यांच्या हस्ते बोधी वृक्ष लागवड करण्यात आले. तसेच वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. रमेश दंडे, डॉ. संतोष इंगळे, संतोष काकड, अंढेराच्या सरपंच रुपाली आंबिलकर व उपसरपंच लता सानप यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गणेश नागरे, गजानन सानप, किरण पालवे, पंढरी तेंजनकर, भारत तेंजनकर, गजानन कुटे, मधुकर चव्हाण, सतीश देशमुख तसेच पत्रकार ज्ञानेश्वर म्हस्के, सरपंच पती रामदास आंबिलकर, रवी सानप यांच्या हस्ते प्रत्येकी एका वृक्षाची लागवड करण्यात आली. तसेच बौध्द विहार परिसरामध्ये ज्येष्ठ कलावंत सीताराम इंगळे यांच्या हस्ते बोधीवृक्ष लावण्यात आला. यावेळी वृक्ष जगवण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याने घेतली.

130721\45121551-img-20210713-wa0089.jpg

अंढेरा वृक्षारोपण फोटो

Web Title: Plantation near Ekta Dhwaj at Andhera