जिजामाता महाविद्यालयात वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:37 IST2021-08-19T04:37:41+5:302021-08-19T04:37:41+5:30

बुलडाणा : स्थानिक जिजामाता महाविद्यालयात सन २००० मध्ये बी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी वृक्षाराेपण केले़ तसेच ...

Plantation at Jijamata College | जिजामाता महाविद्यालयात वृक्षाराेपण

जिजामाता महाविद्यालयात वृक्षाराेपण

बुलडाणा : स्थानिक जिजामाता महाविद्यालयात सन २००० मध्ये बी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी वृक्षाराेपण केले़ तसेच महाविद्यालय प्रशासनाला ११ हजार राेख रक्कम दिली़

१५ ऑगस्टच्या सकाळी ॲड. राज शेख यांच्या संकल्पनेनुसार जवळपास २० ते २५ माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले़ त्यानंतर महाविद्यालय प्रशासनास ११ हजार रूपयाची रोख रकम देऊन मदत केली. यावेळी ॲड. राज शेख, अनिल दांडगे, ॲड. शहेजाद बागवान, ॲड. विनोद तायडे, ज्ञानेश्वर पिसे, गजानन शिंब्रे, सुनील मुळे, चंद्रशेखर पाठक, मोहन हिवाळे, प्रशांत इंगळे, अमोल देशपांडे, शैला कोलते, अनिता गोसावी, प्रतिभा खिल्लारे, संगीता अंभोरे, प्रा. मिलिंद जाधव, प्राचार्य कोठे, सिरसाठ आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation at Jijamata College