फिर्यादीच निघाला आराेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST2021-09-07T04:41:14+5:302021-09-07T04:41:14+5:30

अमडापूर : चिखली तालुक्यातील ऐनखेड फाट्यावरून अज्ञात चाेरट्यांनी ट्रक लंपास केल्याची तक्रार चालकाने अमडापूर पाेलिसांत केली हाेती़ पाेलिसांनी या ...

The plaintiff left | फिर्यादीच निघाला आराेपी

फिर्यादीच निघाला आराेपी

अमडापूर : चिखली तालुक्यातील ऐनखेड फाट्यावरून अज्ञात चाेरट्यांनी ट्रक लंपास केल्याची तक्रार चालकाने अमडापूर पाेलिसांत केली हाेती़ पाेलिसांनी या चाेरीचा उलगडा केला असून चालकानेच ट्रक लंपास केल्याचे तपासात समाेर आले आहे़ त्यामुळे अमडापूर पाेलिसांनी चालक शेख शरीफ शेख कासम यास अटक केली आहे़ त्याच्याकडून चाेरीस गेेलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे़

शेख शरीफ शेख कासम याने ट्रक क्रमांक एम. एच. १८ -एए- ७६८२, किंमत आठ लाख लव्हाळा रस्त्याने ऐनखेड फाट्याजवळ उभा केला हाेता़ हा ट्रक अज्ञात चाेरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद शेख शरीफ याने पाेलिसांत दिली हाेती़ या प्रकरणी अमडापूर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून ठाणेदार नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सय्यद हरून, पो.काॅ. शत्रुघ्न शिंदे, नांगरे, दीपक चव्हाण, भुतेकर यांनी तपास सुरू केला हाेता़ तपासादरम्यान चालकाने पाेलिसांची दिशाभूल करण्यासाठी फिर्याद दिल्याचे समाेर आले़ पाेलिसांनी भुसावळ जवळून ट्रक जप्त केला़ तसेच आराेपी शेख शरीफ शेख कासम यास अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The plaintiff left