महामार्गावरील खड्डे जीवघेणे

By Admin | Updated: September 25, 2014 23:58 IST2014-09-25T23:58:59+5:302014-09-25T23:58:59+5:30

खामगाव ते कोलोरी दरम्यान रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य; खड्डे बुजविण्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष.

Pits on the highway to die | महामार्गावरील खड्डे जीवघेणे

महामार्गावरील खड्डे जीवघेणे

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील खामगाव ते कोलोरी दरम्यान रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने या खड्डयामध्ये वाढ होत असून खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्यावर अपघात घडत असून खड्डे जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर दररोज हजारो वाहने धावत आहेत. रस्ता दोन पदरी असताना सुध्दा या मार्गावर अनेकदा अपघात घडतात. खामगाव ते कोलोरी दरम्यानचा रस्ता हा अपघातासाठी कुप्रसिध्द आहे. कोलोरी नजीकच्या वळणावर महिनाभरात हमखास एक-दोन अपघात होतात. सद्यास्थितीत या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. ऐन पावसाळ्याचे दिवस असतानाही या खड्डयामध्ये साधा मुरूमही भरण्याचे काम संबंधित विभागाने केले नसल्याचे दिसून येते. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनधारकांकडून अपघात घडत आहे. तसेच खामगाव नांदुरा रस्ता दरम्यानही मोठय़ा प्रमाणात खड्डे निर्माण झाले झाले आहेत. मात्र त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Pits on the highway to die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.