बसगाड्यांची दयनीय अवस्था
By Admin | Updated: November 22, 2014 01:17 IST2014-11-22T01:17:01+5:302014-11-22T01:17:01+5:30
खामगाव बसस्थानकातील प्रकार.

बसगाड्यांची दयनीय अवस्था
खामगाव (बुलडाणा): खामगाव आगारातील बसगाड्यांची सध्या दयनीय अवस् था झाली आहे. एसटीमधील बसायच्या सिटा तुटल्या, पत्रे निघाली आहेत. अनेक गाड्यांच्या काचाही तुटलेल्या अवस्थेत आहे; परंतु याकडे संबंधिताचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचा प्रवास डोकेदुखी ठरत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना सेवा पुरवित आहे. खासगी वाहनधारकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने एसटी तोट्यात चालल्याचे दिसते; मात्र अशाही स्थितीत उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूत वेळ न चुकवता एसटी गावच्या बसथांब्यावर उभी राहत आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या गावात एसटी पोहचली आहे. ज्येष्ठ नागरिक, स्वा तंत्र्य सैनिक, अपंग तसेच विद्यार्थ्यांंना विविध पासेसच्या सोयी उपलब्ध एसटीने केल्या आहेत. जणू काही सर्वच प्रवाशांची हमी एसटीने घेतल्याने आजही लोकांचा विश्वास कायम आहे.
एसटीकडे प्रवाशांची ओढ असताना खामगाव आगार मात्र प्रवाशांना सोयी पुरविण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. अनेक खिळखिळ्या गाड्या रस् त्यावर आणल्या आहेत. या गाड्यामधील बसावयाच्या सिटा पूर्णत: निघाल्या आहेत. काही ठिकाणी तर केवळ लोखंडी ढाचाच राहिला आहे.