उन्हाळी सुट्टीमध्ये कागदावरच शिजते खिचडी !
By Admin | Updated: May 26, 2015 02:27 IST2015-05-26T02:27:20+5:302015-05-26T02:27:20+5:30
लोकमत चमूने दिल्या १८४ शाळांना भेटी

उन्हाळी सुट्टीमध्ये कागदावरच शिजते खिचडी !
बुलडाणा : दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार अर्थात खिचडीचे वाटप करण्यात यावे, असे आदेश सर्व जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांना आहेत; मात्र अध्र्याअधिक शाळांमध्ये खिचडीच शिजविल्या जात नाही. प्रत्यक्षात मात्र या शाळांमधील मुले नियमित हजर राहतात व खिचडी खातात, असे अहवाल तयार केले जात असल्याने कागदावर शाळांमधील खिचडी शिजत असल्याचा प्रकार ह्यलोकमतह्ण ने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये उघड झाला. ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असोत की नगरपालिका क्षेत्रातील शाळा असोत सर्वत्र परिस्थिती सारखीच असल्याचे वास्तव समोर आले आहे. ह्यलोकमतह्ण चमूने सोमवारी सकाळी ८ पासून १0 वाजेपर्यंंत प्रत्येक शाळेमध्ये हजेरी लावून शालेय पोषण आहार वितरणाची माहिती जाणून घेत पाहणी केली. जिल्हाभरातील १८४ शाळांमध्ये प्रत्यक्ष हजेरी लावल्यावर ६0 शाळांमध्ये खिचडी शिजल्याचे दिसून आले. तर अनेक शाळा बंद आढळल्या. ज्या शाळा उघड्या होत्या त्यापैकी अनेक ठिकाणी विद्यार्थीच नाहीत, तर खिचडी कोणासाठी शिजवायची, असा प्रश्न उपस्थित केला गेला. काही शाळांमध्ये मात्र िखचडी शिजली होती. विद्यार्थ्यांंची संख्या कमी असल्याने खिचडीचे काय करायचे, असाही प्रश्न तेथील शिक्षकांसमोर उभा असल्याचे ह्यलोकमतह्ण चमूला दिसून आले. उन्हाळय़ामध्ये मुलांना नियमित पोषण आहार मिळावा म्हणून शासनाने दुष्काळी जिल्ह्यात खिचडी वाटप नियमित सुरू ठेवण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात मात्र या आदेशाचे कुठेही पालन होताना दिसत नाही.