पैशांसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ; सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल
By अनिल गवई | Updated: December 28, 2023 14:42 IST2023-12-28T14:41:45+5:302023-12-28T14:42:42+5:30
पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत विवाहितेच्या तक्रारीवरून शेगाव पोलीसांनी सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

पैशांसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ; सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल
खामगाव: पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत विवाहितेच्या तक्रारीवरून शेगाव पोलीसांनी सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार काजल श्यामसिंग बयस(२५ रा. रेल्वे कॉलनी, शेगाव ) या विवाहितेचे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील श्यामसिंग बयस यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर एक अपत्य हाेईपर्यंत सासरच्यांशी चांगले वागविले. त्यानंतर माहेरहून पैशांसाठी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला.
माहेरची परिस्थिती हलाखिची असल्यामुळे पैसे देण्यास असमर्थ असल्याने सासरच्या मंडळीने मारझोड करून अश्लिल शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून शेगाव पोलीसांनी सासरा कैलाससिंग जयसिंग बयस , सासू चंद्रलेखा बयस, बिरजू कैलाससिंग बयस, जेठानी अनिता बिरजू बयस, इंद्रपाल कैलास सिंग बयस, जेठाणी लोचन इंद्रपाल बयस, पती श्यामसिंग बयस सर्व रा. मालेगाव जि. वाशिम यांच्या विरोधात भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेका सुनिल सुसर करीत आहेत.