महिलेचे शारीरिक शोषण; सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 1, 2016 02:31 IST2016-09-01T02:31:17+5:302016-09-01T02:31:17+5:30

नांदुरा तालुक्यातील चांदुराबिस्वा येथील घटना.

Physical abuse of the woman; Filed a complaint against Sarpanch | महिलेचे शारीरिक शोषण; सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

महिलेचे शारीरिक शोषण; सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा(जि. बुलडाणा), दि. ३१: अंगणवाडीसेविका म्हणून नोकरी लावतो, असे आमिष देत विधवा महिलेचे गेल्या एक महिन्यापासून शारीरिक शोषण करणार्‍या चांदुराबिस्वा सरपंच नईमखॉ जिलानीखॉ (वय ३२) यांच्याविरुद्ध पीडित महिलेच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. याबाबत चांदुरबिस्वा येथील ३४ वर्षीय विधवा महिलेने मंगळवारी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली, की सरपंच नईमखॉ जिलानीखॉ (वय ३२) याने अंगणवाडीसेविका म्हणून नोकरी लावून देतो व घरकुल मिळवून दे तो, असे आमिष दाखवून एक महिन्यापूर्वी बलात्कार केला. त्यानंतर अनेकवेळा इच्छेविरुद्ध शारीरिक शोषण केले. या प्रकरणाची कुठे माहिती दिल्यास धमकीही दिली. सदर महिलेच्या या आशयाच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी सरपंच नईमखॉ याचेविरुद्ध कलम ३७६, ३५४, ३५४ (ब) (अ), ४५२, ३२३, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय सचिन शिंदे, पीएसआय मिसाळे, पीएसआय कांडुरे, पोहेकाँ हेलोडे, हजारे करी त आहेत. बलात्काराच्या या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे.

Web Title: Physical abuse of the woman; Filed a complaint against Sarpanch