लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण
By Admin | Updated: May 7, 2015 01:10 IST2015-05-07T01:10:54+5:302015-05-07T01:10:54+5:30
लोणी गुरव येथील घटना ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण
खामगाव : लग्नाचे आमिष दाखवून २0 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध ठेवत ितच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने सदर युवती पाच महिन्यांची गर्भवती झाल्याचे ५ मे रोजी उघडकीस आले. त्यामुळे याप्रकरणी पीडित युवतीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादीवरुन पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील लोणीगुरव येथील महेश शामराव पवार (वय २0) याने गावातीलच २0 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यातून सदर युवती ५ महिन्याची गर्भवती राहिली. ही बाब उघडकीस आल्यानंतर उपरोक्त आशयाची फिर्याद पीडित कुमारिकेने ५ मे रोजी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी महेश शामराव पवार याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.